maharashtra

मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी


देवकरवाडी ता.सातारा येथे दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

सातारा : देवकरवाडी ता.सातारा येथे दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोरखनाथ रत्नु देवकर यांनी राहूल देवकर, भास्कर देवकर, संतोष देवकर यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. दुसरी तक्रार भास्कर रामदास देवकर यांनी अजित देवकर, अमित देवकर, गोरख देवकर यांच्यासह महिलेविरुध्द (सर्व रा. देवकरवाडी) तक्रार दिली आहे. ही घटना दि. 29 नोव्हेबर रोजी देवकरवाडी येथे घडली आहे. संशयितांनी एकमेकांना कोयता, कुर्हाड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.