maharashtra

सिमेंटची पोती घेऊन जाणारा आयशर टेम्पो पलटी


Eicher tempo flipping while carrying bags of cement
सिमेंटची पोती घेऊन जाणारा आयशर टेम्पो भरतगाववाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत पलटी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

सातारा : सिमेंटची पोती घेऊन जाणारा आयशर टेम्पो भरतगाववाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत पलटी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी सातारा येथून सिमेंटची पोती घेऊन आयशर टेम्पो कराडकडे जात असताना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी गावच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे आयशर टेम्पो पलटी झाला.  या अपघातामुळे सिमेंटची पोती रस्त्यावर पडून काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्ववत सुरू केली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.