येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ डिसेंबर रोजी १० ते दि. १५ डिसेंबर रोजी ७ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ९ समोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच. ११ बीपी ४६३३ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार रवींद्र चंद्रकांत संकपाळ, वय ३७, रा. रहिमतपुर, ता. कोरेगाव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.


