maharashtra

अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू


येथील वाढे फाटा परिसरात अपघातात जखमी झालेल्या एकाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

सातारा : येथील वाढे फाटा परिसरात अपघातात जखमी झालेल्या एकाचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भिवा तुकाराम टोळे, रा. रामोशीवाडी, पुणे यांचा सातारा येथील वाढे फाटा उड्डाण पुलाजवळ अपघात झाल्याने त्यात ते जखमी झाले होते.  त्यांच्यावर सातारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना  दि. ६ रोजी ११.४५ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याची खबर डॉ. सुरेश शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.