maharashtra

जिल्ह्यात दोन दारु अड्ड्यांवर छापे


Raids on two liquor dens in the district
सातारा जिल्ह्यात दोन दारू अड्ड्यावर छापे टाकून पोलिसांनी १७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सातारा ; सातारा जिल्ह्यात दोन दारू अड्ड्यावर छापे टाकून पोलिसांनी १७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. कालगाव, ता.  कराड गावच्या हद्दीत जैनुद्दीन मुल्ला हा राहत्या घराच्या आडोशाला दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून  ९६० रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. दुसऱ्या घटनेत खेड, ता. कोरेगाव पंचशील नगर बसस्टॉपच्या शेजारी चिंचेच्या झाडाच्या आडोशाला येथे तेथीलच महेश रामचंद्र मोरे हा दारु विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ७५० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.