maharashtra

दोघांना मारहाण केल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा


दोघांना मारहाण केल्याप्रकरणी सातजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : दोघांना मारहाण केल्याप्रकरणी सातजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास शुभम शंकर सावंत राहणार कसाई मळा, लिंब, तालुका सातारा हे त्यांचा चुलत भाऊ रत्नदीप सावंत आणि मावस बहीण अर्चना किसन सावंत यांच्याशी ग्रामपंचायत कार्यालय लिंब येथे बोलत उभे असताना नितीन सर्जेराव सावंत, बिपिन सर्जेराव सावंत दोघेही राहणार चतुरबेट लिंब, रवींद्र शंकर शिंदे राहणार लिंब शेरी, सौरभ शिवाजी सावंत, पंकज कृष्णात सावंत, मंगेश काशिनाथ सावंत सर्व राहणार चतुरबेट, लिंब, तालुका सातारा आणि मानसिंग मुकुंद सावंत राहणार विठ्ठलवाडी, लिंब तालुका सातारा यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून शुभम आणि रत्नदीप सावंत यांना लाकडी दांडक्याने व काठीने मारहाण केली. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार बागवान करीत आहेत.