maharashtra

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोहम भोईटे प्रथम


फलटण पंचायत समिती (शिक्षण विभाग) समग्र शिक्षा अभियानअंतर्गत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाल्या. या स्पर्धा सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी गट साधन केंद्र फलटण येथे इ. ३ री ते ५ वी या वयोगटात झाल्या. यामध्ये सातारा जिल्हा परिषद शाळा आदर्की बुद्रुक येथील सोहम परमेश्वर भोईटे याचा प्रथम क्रमांक, स्वराली विकास भिसे, जावली हिचा द्वितीय क्रमांक तर प्रणिती प्रकाश क्षीरसागर, विडणी हिचा तृतीय क्रमांक आला.

सातारा : फलटण पंचायत समिती (शिक्षण विभाग) समग्र शिक्षा अभियानअंतर्गत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाल्या. या स्पर्धा सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी गट साधन केंद्र फलटण येथे इ. ३ री ते ५ वी या वयोगटात झाल्या. यामध्ये सातारा जिल्हा परिषद शाळा आदर्की बुद्रुक येथील सोहम परमेश्वर भोईटे याचा प्रथम क्रमांक, स्वराली विकास भिसे, जावली हिचा द्वितीय क्रमांक तर प्रणिती प्रकाश क्षीरसागर, विडणी हिचा तृतीय क्रमांक आला. सोहम भोईटे याची जिल्हास्तरीय निवड करण्यात आली आहे. यासाठी परिक्षक म्हणून प्रा. रविंद्र कोकरे होते.
फलटण तालुक्यात २२ केंद्रशाळा आहेत. यामधून २२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षा ३ री ते ५ वी या लहान गटात झाल्या. यासाठी आझादी का महोत्सव या राज्यशासनाच्या सूचनेनुसार 'मी तिरंगा बोलतोय' हा विषय देण्यात आला होता. यामध्ये केंद्रस्तरीय परीक्षेनंतर तालुकास्तरावर परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये सोहम भोईटे याचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक येवून त्याची जिल्हास्तरावर वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार-गावडे, गटशिक्षणाधिकारी सौ. शाहीन पठाण, विस्तारअधिकारी अनिल संकपाळ, केंद्रप्रमुख रामचंद्र रणवरे, स्पर्धेचे आयोजक सौ. देवयानी कुंभार, मुख्याध्यापक सौ. लता भोईटे, वर्गशिक्षक सौ. शुभांगी रणवरे, सौ. प्रतिमा डोंगरे, सौ. वंदना शिंदे व आदर्की ग्रामस्थांनी अभिनंदन केले.