maharashtra

देशी दारु प्रकरणी एकावर गुन्हा


Crime on one of the indigenous liquor cases
सातारा तालुक्यातील जकातवाडी हद्दीत असणाऱ्या बोगदा ते जकातवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सातारा तालुका पोलिसांनी देशी दारु जप्त केली आहे.

सातारा : सातारा तालुक्यातील जकातवाडी हद्दीत असणाऱ्या बोगदा ते जकातवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सातारा तालुका पोलिसांनी देशी दारु जप्त केली आहे.
याप्रकरणी राहूल गुजाबा गुजर (वय २१, रा. ४४६, मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११६0 रुपयांच्या दारुच्या १९ बाटल्या जप्त केल्या आहेत. सातारा तालुका पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे.