maharashtra

दांपत्याला धमकी देणाऱ्याच्या विरोधात गुन्हा


पोवई नाक्यावर दांपत्याला धमकी देणाऱ्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सपना अर्जुन सूर्यवंशी राहणार सैदापूर फाटा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

सातारा : पोवई नाक्यावर दांपत्याला धमकी देणाऱ्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सपना अर्जुन सूर्यवंशी राहणार सैदापूर फाटा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.
ओ एस शेख राहणार शनिवार पेठ लकडी पुलाजवळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पोवई नाक्यावरील अवंती बार समोर फिर्यादी आणि त्यांचे पती तेथे उभे असताना शेख याने अर्जुन सूर्यवंशी याला तुम्ही काय व्यवसाय करता माहित आहे. माझी पोलिसात ओळख आहे. पोलिसांना सर्व सांगणार आहे, असे म्हणून सूर्यवंशी याला पुन्हा तू साताऱ्यात दिसायचे नाही, अशी धमकी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी अधिक तपास करत आहेत.