maharashtra

फलटण येथे दोन पिस्तुल व काडतुसासह दोन जणांना अटक

स्विफ्ट कारसह ७ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Two arrested with two pistols and cartridges at Phaltan
फलटण येथून दोन पिस्तुल व एका काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे ३ पिस्तूल, १ जिवंत काडतुस, ७ मोबाइल, ११ बॅटऱ्या, एक स्विफ्ट कार, शस्त्र व रोख रक्कम असा एकूण ७ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. किरण बबन साळुंखे, वय ३८, सध्या रा. लेक पॅलेस अपार्टमेंट, शिरवळ, ता. खंडाळा आणि तरबेज मेहबूब सुतार, वय ३८, रा. ओमसाई अपार्टमेंट, वरखडे नगर, कात्रज, पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सातारा : फलटण येथून दोन पिस्तुल व एका काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे ३ पिस्तूल, १ जिवंत काडतुस, ७ मोबाइल, ११ बॅटऱ्या, एक स्विफ्ट कार, शस्त्र व रोख रक्कम असा एकूण ७ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. किरण बबन साळुंखे, वय ३८, सध्या रा. लेक पॅलेस अपार्टमेंट, शिरवळ, ता. खंडाळा आणि तरबेज मेहबूब सुतार, वय ३८, रा. ओमसाई अपार्टमेंट, वरखडे नगर, कात्रज, पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यात फरार असणारे संशयित शस्त्रांसह स्विफ्ट कारने फलटण, ता. फलटणकडे येत असल्याची माहिती फलटण येथील पोलिसांना समजली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील जिंती नाका, बारामती चौक, नाना पाटील चौक या ठिकाणी सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट कार बारामती येथील पुलावर आल्यानंतर पोलिसांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कार न थांबता पुढे गेल्याने पोलिसांनी कारचा पाठलाग करत रानडे पेट्रोल पंपाच्या समोर कारला थांबून त्यामधील किरण बबन साळुंखे, वय ३८, सध्या रा. लेक पॅलेस अपार्टमेंट, शिरवळ, ता. खंडाळा आणि तरबेज मेहबूब सुतार, वय ३८, रा. ओमसाई अपार्टमेंट, वरखडे नगर, कात्रज, पुणे या दोघांना ताब्यात घेतले. कारची तपासणी केली असता त्यामध्ये २ पिस्तुल, १ काडतुस, ७ मोबाइल, ११ बॅटऱ्या, एक स्विफ्ट कार, शस्त्र व रोख रक्कम असा एकूण ७ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. तो हस्तगत करण्यात आला आहे. दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.