maharashtra

पेरले येथे जुगार अड्डयावर छापा

१ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये जुगार अड्डयांवर छापा सत्र सुरूच असून पेरले, ता. कराड येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून सुमारे १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सातारा : पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने जिल्ह्यामध्ये जुगार अड्डयांवर छापा सत्र सुरूच असून पेरले, ता. कराड येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून सुमारे १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पेरले गावच्या हद्दीत सटवाई मंदिरा शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाच्या आडोशाला जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी सतीश रोहिदास विधाते, सुभाष ज्ञानू चव्हाण, किरण गोरख चव्हाण, दिलीप तुकाराम चव्हाण, आबासाहेब यशवंतराव भोसले, बाबू विठ्ठल चव्हाण सर्व रा. पेरले हे जुगार खेळताना आढळून आले त्यांच्याकडून १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामध्ये रोख रक्कम जुगाराचे साहित्य व तीन दुचाकींचा समावेश आहे.