maharashtra

सातारा येथे मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हे


येथील पंताचा गोट परिसरात राहत्या घरी एकाला मारहाण केल्याबद्दल चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील पंताचा गोट परिसरात राहत्या घरी एकाला मारहाण केल्याबद्दल चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ नोव्हेंबर रोजी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास अजय माधव देडगे, वय २४, रा. पंताचा गोट, सातारा याला राहत्या घरासमोर प्रेमविवाह केल्याच्या राग मनात धरून शिवम मनोज पवार, पंकज सुभाष पवार, ऋषिकेश संजय पवार, शोन संजय पवार सर्व रा. पंताचा गोट यांनी मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.