maharashtra

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा


Five charged with inciting a married woman to commit suicide
अपंगत्वावरुन सतत टोमणे मारुन तसेच वारंवार त्रास देवून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातारा अंगापूर वंदन येथील चौघे आणि किरोली येथील एकजण अशा पाचजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यमुना घाडगे, तुकाराम घाडगे, विकास घाडगे, ज्योती घाडगे आणि नामदेव चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सातारा : अपंगत्वावरुन सतत टोमणे मारुन तसेच वारंवार त्रास देवून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातारा अंगापूर वंदन येथील चौघे आणि किरोली येथील एकजण अशा पाचजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यमुना घाडगे, तुकाराम घाडगे, विकास घाडगे, ज्योती घाडगे आणि नामदेव चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, सातारा तालुका पोलिसांनी विकास घाडगे आणि ज्योती घाडगे या दोघांना अटक केली होती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सयाजी मारुती घाडगे (वय ५९, रा. टकले बोरगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी अनिता अरुण घाडगे (वय २८, रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) या तिच्या मुलासाठी आणि स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी संपत्तीमध्ये अधिकार मागत होत्या. मात्र, सासू यमुना तुकाराम घाडगे, सासरा तुकाराम बाबुराव घाडगे, दीर विकास तुकाराम घाडगे, जाऊ ज्योती विकास घाडगे (सर्व रा. अंगापूर वंदन, ता. सातारा) आणि नामदेव चव्हाण (रा. किरोली, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे पाचजण अनिता यांना त्रास देत होत्या. त्यांचा मानसिक छळ, जाचहाट करत होते. ती राहत असलेल्या घराचा वीजपुरवठा, पाणीपुरवठा बंद करण्याबराबेरच शौचालय वापरुन देत नव्हते. तिच्या अपंगत्वावरुन दीर विकास आणि जाऊ ज्योती हे दोघे टोमणे मारुन हसत होते. 'तु तुझ्या आईवडिलांकडे जावून रहा. तुझा येथे काही संबंध नाही,' असे म्हणून त्रास दिला जात होता. ज्योती आणि नामदेव चव्हाण हे दोघे अनिता आणि फिर्यादी सयाजी घाडगे यांना धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून अनिता यांनी पोलीस ठाणे आणि अंगापूर वंदन येथील तंटामुक्ती समिती तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्यातील महिला समुपदेशन केंद्रात तक्रारी केल्या होत्या. मात्र, सततच्या त्रासाला कंटाळून अनिता अरुण घाडगे यांनी शुक्रवार, दि. ३१ रोजी पाच वाजण्यापूर्वी अंगापूर वंदन गावाच्या हद्दीत असणाऱ्या बेल नावाच्या शिवारातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.
याबाबतची तक्रार दि. १ रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर यमुना घाडगे, तुकाराम घाडगे, विकास घाडगे, ज्योती घाडगे आणि नामदेव चव्हाण या पाचजणांवर गुन्हा दाखल झाला. यापैकी दीर विकास घाडगे आणि जाऊ ज्योती घाडगे या दोघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव करत आहेत.