maharashtra

वाई हत्याकांड; ज्योती मांढरे हिचा उलटतपास पूर्ण


wai massacre; Jyoti Mandhare's cross-examination is complete
वाई हत्याकांड सुनावणीमध्ये मंगल जेधे खून प्रकरणातील माफीचा साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे हिचा उलटतपास पूर्ण झाला असून आता उर्वरीत साक्षी, पुरावे घेतले जाणार आहेत. तसेच सलमा शेख प्रकरणात ज्योतीच्या उलट साक्षीला सुरुवात करावी, असे आदेश कोर्टाने बचाव पक्षाला दिले. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी दि. 20 डिसेंबर रोजी होणार आहे.

सातारा : वाई हत्याकांड सुनावणीमध्ये मंगल जेधे खून प्रकरणातील माफीचा साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे हिचा उलटतपास पूर्ण झाला असून आता उर्वरीत साक्षी, पुरावे घेतले जाणार आहेत. तसेच सलमा शेख प्रकरणात ज्योतीच्या उलट साक्षीला सुरुवात करावी, असे आदेश कोर्टाने बचाव पक्षाला दिले. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी दि. 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
वाई हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सातारा जिल्हा न्यायालयात सुरु आहे. मंगळवारी या खटल्याची नियमित सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम, सहाय्यक सरकारी वकील मिलिंद ओक, बचाव पक्षाचे अ‍ॅड. श्रीकांत हुटगीकर तसेच डॉ.संतोष पोळ, ज्योती मांढरे न्यायालयात उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून वाई हत्याकांड प्रकरणातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिचा मंगल जेधे खून प्रकरणात उलटतपास सुरु होता. मॅरेथॉन उलटतपास पूर्ण झाल्यानंतर आता सलमा शेख प्रकरणात तिचा उलटतपास सुरु करावा, असे आदेश न्यायाधिशांनी दिले. दरम्यान, मंगल जेधे खून प्रकरणातील उर्वरीत साक्षी, पुरावे याचे कामकाज सुरु होणार आहे. यामुळे याप्रकरणात आता आणखी कोर्टासमोर कोणत्या बाजू येणार? सलमा शेख प्रकरणात ज्योतीचा उलटतपास कधी सुरु होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.