maharashtra

अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग

देवेंद्र फडणवीसांनी सादर केले पुरावे

Nawab Malik's involvement in the affairs of the underworld
मागील काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. तसेच मलिकांनी एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले.याच पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट अंडरवर्ल्डशी नवाब मलिक यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे.

मुंबई : मागील काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. तसेच मलिकांनी एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले.याच पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट अंडरवर्ल्डशी नवाब मलिक यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले आहेत.
यावेळी फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही साडेतीन कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली,’ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, सलीम पटेल हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा ड्रायव्हर, फ्रंट मॅन आहे, तो देखील या जमिनीचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या किमान ५ व्यवहारांची माहिती आपल्याकडे असून त्याची कागदपत्र संबंधित तपास यंत्रणांना आपण देणार असल्याचेही यावेळी फडणवीसांनी सांगितले.
चित्रा वाघ यांची जोरदार टीका

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी आणि राज्य सरकार वर टीका केली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटल की, १९९३ बॅाम्ब ब्लास्ट मधील आरोपींच्या मित्रांशी मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसले आहेत… सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.