चक्कर येऊन बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना खडकी, ता. माण येथे घडली. दरम्यान सातारा येथील पोलीस लाईन येथेही अशीच एक घटना घडली.
सातारा : चक्कर येऊन बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना खडकी, ता. माण येथे घडली. दरम्यान सातारा येथील पोलीस लाईन येथेही अशीच एक घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १९ रोजी ६.३० वाजण्याच्या सुमारास खडकी येथे तेथीलच सत्यवान गणपत साळुंखे हे शेतात गेले असता ते चक्कर येऊन बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दुसऱ्या घटनेत अजय लक्ष्मण भोसे, वय ५२, रा. सिटी पोलीस लाईन, सातारा यांना दि. १९ रोजी सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी चक्कर आली. त्यानंतर ते बेशुद्ध पडले त्यांना तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची खबर डॉ. कुलकर्णी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


