maharashtra

जिल्ह्यातून दोन जणी बेपत्ता


सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन जणी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन जणी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पल्लवी जगन्नाथ पाटील, वय २३ ही शिरवळ ता खंडाळा येथे नोकरीनिमित्त मैत्रीणी समवेत वास्तव्य करते.  दि.१२ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिरवळ, ता. खंडाळा येथील राहत्या घरातून तिच्या मैत्रिणींना मी माझ्या मूळ गावी कार्वे, ता. वाळवा  येथे नोकरी सोडून जात आहे असे सांगून ती निघून गेली असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसऱ्या घटनेत दि. ११ रोजी ९ वाजण्याच्या सुमारास सोळशी, ता. कोरेगाव येथील नेहा संभाजी यादव ही होती वाई येथे महाविद्यालयात जाते असे सांगून निघून गेली त्यात घरी परत न आल्याची तक्रार समीर यादव यांनी वाठार पोलीस ठाण्यात दिली आहे.