कुरून, ता. सातारा नजिक इको कार पुलाला धडकून पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
सातारा : कुरून, ता. सातारा नजिक इको कार पुलाला धडकून पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण पांडुरंग देशमुख, वय २९, रा. कुरून, ता.सातारा हे आपल्या चुलत चुलत्यांना इको कारमधुन रुग्णालयात घेऊन जात असताना आज बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुरून बस स्टॉप नजीक असलेल्या पुलाला इको कार धडकून पलटी होऊन त्यात ते जखमी झाले. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले. असून त्यांची नावे समजू शकली नाही. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


