maharashtra

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा


अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 23 डिसेंबर 2022 ते २१ फेब्रुवारी 2023 पर्यंत सातारा शहरा नजीकच्या एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस वारंवार त्रास देऊन, तिची बदनामी करून तसेच तिला मारहाण करून तिचा मित्र अथर्व काटकर यासही मारहाण केल्याप्रकरणी प्रथमेश प्रशांत माने रा. धनगरवाडी सातारा, अली शेख (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) आणि त्यांच्या सोबतच्या अनोळखी दोघाजणां विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.