maharashtra

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 31 जानेवारी रोजी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मायणी, ता. खटाव गावच्या हद्दीत असलेल्या मायणी एसटी स्टँड येथील पाणी पिण्याच्या टाकीजवळ जुन्या भांडणाचा राग मनात धरून सनेल शिवाजी मदने रा. मायणी, ता. खटाव याने तेथीलच अक्षय सोपान जाधव यांना बर्फ फोडण्याचा टोचा मारुन गंभीर मारहाण केली.
याप्रकरणी मध्ये यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पालेकर करीत आहेत.