maharashtra

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केसरकर पेठ, सातारा येथे जानेवारी 2023 ते 27 फेब्रुवारी अखेर एका अल्पवयीन मुलीस वारंवार त्रास दिल्या प्रकरणी तेथीलच जगन्नाथ दीपक पाटसुते याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोटे करीत आहेत.