maharashtra

सातारा तालुक्यातील दोन जुगार अड्ड्यांवर छापा

74 हजार 280 रुपये हस्तगत; 14 जणांवर प्रतिबंधक कारवाई

Raid on two gambling dens in Satara taluka
सातारा तालुका हद्दीत पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 74 हजार 280 रुपये हस्तगत करुन 14 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

सातारा : सातारा तालुका हद्दीत पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 74 हजार 280 रुपये हस्तगत करुन 14 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागठाणे, ता. सातारा गावच्या हद्दीत चौंडेश्वरी पान स्टॉलच्या पाठीमागे  तेथीलच आनंद दिनकर खोटे, गणेश जनार्दन नलावडे, रोहित  संजय बोडरे, हाजी मुल्ला, सुरज सुनील काळे, अशोक हणमंत मोहिते, सुभाष दिनकर साळुंखे, सुरज शंकर जाधव, रा. अतित, ता.  सातारा, सुनिल रामचंद्र सोनवणे, रा. समर्थगाव, ता. सातारा,  दत्तात्रय रघुनाथ जाधव, सौरभ प्रकाश घोरपडे  सौरभ प्रकाश घोरपडे दोघेही रा. शेंद्रे, ता. सातारा, हे बाराजण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून 71 हजार 640 रुपये हस्तगत करण्यात आले.
दुसर्‍या घटनेत सातारा येथील काशी विश्वेश्वर मंदिराजवळ असलेल्या पानटपरीच्या आडोशाला तेथीलच जयंत बजरंग इनामदार, बजरंग श्रीरंग चव्हाण रा. नागठाणे, ता. सातारा हे जुगार खेळताना आढळून आले त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व 2 हजार 640 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.