maharashtra

जिल्ह्यात दोन जुगार अड्डयांवर छापे


Raids on two gambling dens in the district
सातारा येथील पोवई नाका परिसरात असणाऱ्या भारत भवन हॉटेलच्या समोर गल्लीतील भिंतीच्या आडोशाला श्रीधर गोविंद खंदारे, रा. पवारवस्ती, कोडोली, ता. सातारा हा जुगार घेताना आढळून आला.

सातारा : सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १ हजार ५२५ रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील पोवई नाका परिसरात असणाऱ्या भारत भवन हॉटेलच्या समोर गल्लीतील भिंतीच्या आडोशाला श्रीधर गोविंद खंदारे, रा. पवारवस्ती, कोडोली, ता. सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून ४४० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. दुसऱ्या घटनेत फुलेनगर, जकात नाका, वाई, ता. वाई येथे झाडाच्या आडोशाला राहुल लक्ष्‍मण भोसले, रा. सोनजाई विहार, ए विंग, यशवंतनगर, वाई हा जुगार घेताना आढळून आला त्याच्याकडून १ हजार ५२५  रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.