maharashtra

रहिमतपुर येथून मोटरची चोरी


रहिमतपुर, ता. कोरेगाव येथून अज्ञात चोरट्याने मोटरची चोरी केल्याची तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : रहिमतपुर, ता. कोरेगाव येथून अज्ञात चोरट्याने मोटरची चोरी केल्याची तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ ते दि.१६ सप्टेंबर २०२२ दरम्यान रहिमतपूर येथील शिवारातून ८ हजार रुपये किमतीची ३ एचपीची पाण्याची मोटर अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची तक्रार दिलीप किसन भोसले यांनी रहिमतपुर पोलीस ठाण्यात दिली आहे.