maharashtra

महिलांनी क्रांतीनारी सावित्रीदेवी फुले यांच्या कार्याचा वसा, वारसा जपावा : भानुदास माळी


सावित्रीदेवी फुले यांच्या उत्तुंग व उदात्त लोककार्यास वंदन करताना फक्त त्यांचे प्रतिमापूजन करून उपयोग नाही तर त्यांच्या कार्याला अनुकूल अस आचरण ठेवत महिलांनी त्यांच्या कार्याचा वसा, वारसा जपावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले.

सातारा : दोनशे वर्षांपूर्वीच्या काळातील कर्मठ रूढी, परंपरा, अनिष्ट प्रथा, महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि निरक्षरता या विषयी महिलांना स्वयंसिद्ध आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वतः अनेक यातना कष्ट हसतमुखाने झेलून अक्षरांच्या चांदणवाटेने आपला जीवनप्रवास करत समस्त नारीशक्तीपुढे आपल्या शिक्षणकार्याचा आदर्श दीपस्तंभ ठरलेल्या दुरदृष्टीच्या क्रांतीनारी सावित्रीदेवी फुले या आद्यशिक्षिका आणि थोर समाजसेविका होत्या. सावित्रीदेवी फुले यांच्या उत्तुंग व उदात्त लोककार्यास वंदन करताना फक्त त्यांचे प्रतिमापूजन करून उपयोग नाही तर त्यांच्या कार्याला अनुकूल अस आचरण ठेवत महिलांनी त्यांच्या कार्याचा वसा, वारसा जपावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले.
सवित्रीदेवी फुले यांच्या १९२व्या जयंती निमित्त सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात अभिवादन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष संजीव साळुंखे, सरचिटणीस  धैर्यशील सुपले, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, काँग्रेस अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, अँड. धनावडे, जिल्हा महिला काँग्रेस प्रदेश सचिव मीनाक्षी पाटील, जिल्हा उपाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे इ. मान्यवर महिला उपस्थित होत्या.
यावेळी ५० महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, आज महिला समाज्याच्या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या पेक्षा पुढे आहेत. महिलांना विचारांच मुक्त व्यासपीठ हे फक्त शिक्षणाच्या बळावर मिळालं आणि शिक्षण मिळालं ते सावित्री देवींनी दाखवलेल्या विचार प्रकाशात महिला वावरल्या म्हणून. आज प्रत्येक भारतीय स्त्री सक्षमपणे खंबीरपणे उभी आहे. आज महिलांना जो आत्मसन्मान मिळतो आहे तो केवळ सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच. सावित्री देवींनी शिक्षण घराघरांत पोहचवल त्यामुळे सावित्री बाई या अनेकांच्या प्रेरणास्थान ठरल्या.