maharashtra

शेंद्रे येथून दुचाकीची चोरी


शेंद्रे येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : शेंद्रे येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक सात रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मन्सूर मदन अन्सारी रा. चंदननगर, ता. सातारा यांनी शेंद्रे येथील सर्विस रोडच्या कडेला पार्क केलेली त्यांची हिरो पॅशन प्रो कंपनीची दुचाकी क्र. एमएच 11 सीएम 8096 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.