maharashtra

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सतरा जणांवर गुन्हा


जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सतरा जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सतरा जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येण्या-जाण्याच्या रस्त्याच्या कारणावरून श्वेता उमेश साळुंके वय 48, रा. पसरणी, तालुका वाई या विवाहितेस तेथीलच बबन शंकर आंब्राळे, दिलीप रामचंद्र आंब्राळे आणि पंधरा अनोळखी लोक यांनी घरात घुसून श्वेता साळुंके यांना जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबतची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे खराडे या करीत आहेत.