एकास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता सुमारास आकाश वासुदेवानंद राहणार करंजे तर्फ सातारा याला मोबाईल घेतल्याच्या संशयावरून गणेश पूर्ण नाव माहित नाही राहणार रविवार पेठ सातारा याने लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.


