मोती चौक ते राधिका रोडवर बुधवारी दुपारी वाहतुक सुरळीत करत असताना दोघांनी थेट पोनि संजय पतंगे यांना शिवीगाळ, दमदाटी केली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : मोती चौक ते राधिका रोडवर बुधवारी दुपारी वाहतुक सुरळीत करत असताना दोघांनी थेट पोनि संजय पतंगे यांना शिवीगाळ, दमदाटी केली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन देशमुख, हणमंत देशमुख (दोघे रा.अंबवडे ता.सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस स्वप्नील पवार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यातील एक संशयित निवृत्त फौजी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना बुधवारी दुपारी घडली आहे. मोती चौक ते राधिका रोड परिसरात ट्रॅफिक जॅम असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी गस्त घालणार्या पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार पोनि संजय पतंगे स्वत: काही पोलिसांसोबत मोती चौकातून गेले. पोलिस वाहतुकीस अडथळा ठरणार्या वाहनांना सूचना करत होते. वाहतुक सुरळीत होत असताना संशयित दोघे कार घेवून तेथे थांबले होते. पोलिसांनी त्यांना सूचना केल्यानंतर वाद घातला. वाद विकोपाला जावू लागल्याने वाहतुक पुन्हा ठप्प होवू लागली. यामुळे पोनि पतंगे गेले व त्यांनी दोघांना सूचनांचे पालन करण्यास सांगताच त्यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. सुमारे 15 मिनिटे हा गोंधळ सुरु होता. अखेर सायंकाळी संशयितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.


