maharashtra

महिलेस मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा


A case has been registered against four people for assaulting a woman
अलगुडेवाडी, तालुका फलटण येथे जमीनीच्या कारणावरून एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी चौघा जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अलगुडेवाडी, तालुका फलटण येथे जमीनीच्या कारणावरून एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी चौघा जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 जुलै रोजी अलगुडेवाडी, तालुका फलटण येथे जमिनीच्या कारणावरून समाजाची मीटिंग बसली असता सुरेखा रमेश भिंगारे वैभव राहणार अलगुडेवाडी तालुका फलटण यांना संपत काळू भिंगारे, किरण संपत भिंगारे, सुरज संपत भिंगारे सर्व राहणार अलगुडेवाडी, तालुका फलटण आणि युवराज अण्णा पवार राहणार दहिवडी, तालुका माण यांनी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली असल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक लावंड करीत आहेत.