राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अंकुश शिवा भिंगारदिवे रा. मल्हार पेठ, ता. सातारा हे घरात बाहेरून जाऊन येतो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.


