maharashtra

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


Both have been charged with molesting a woman
येथील शहर परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील शहर परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ जुलै रोजी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात एका अपार्टमेंटच्या गेट बाहेर फिर्यादी महिला गाडी काढत असताना निखिल रमेश भोसले याच्या गाडीला धडक झाली. त्यावेळी वाद झाल्याने निखिल व पोपटराव भोसले यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.