maharashtra

जिल्ह्यातील चार जण बेपत्ता


जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चार जण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

सातारा : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चार जण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता अहिरे कॉलनी सातारा येथून अपूर्वा शंकर घाडगे वय 18 ही मैत्रिणीला भेटून येते, असे सांगून घरातून निघून गेली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून महिला पोलीस नाईक शिंदे अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत दिनांक 7 ऑक्टोबर रोजी नवीन एमआयडीसी येथील एस पी प्लास्टिक्स येथून ऋषिकेश लक्ष्मण पाटेकर वय 26, रा. यवतेश्वर, ता.जि. सातारा हा कंपनीतून निघून गेला आहे.
तिसऱ्या घटनेत धनश्री रोहिदास जाधव वय 18, रा. धकटवाडी, ता. खटाव ही युवती शाळेत जाऊन येते, असे सांगून राहत्या घरातून निघून गेली आहे. या घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
चौथ्या घटनेत नवीन रामचंद्र दीक्षित वय 45, रा. पेडगाव रोड, वडूज ता. खटाव हे राहत्या घरातून बाहेर जाऊन येतो असे सांगून दिनांक 8 ऑक्टोबर पासून बेपत्ता आहेत. या घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.