maharashtra

‘संजीवनी’मार्फत सातार्‍यात प्रथमच नागपंचमी उत्सवाचे आयोजन : वर्षा भोसले


संजीवनी महिला विकास संस्थे मार्फत यंदा प्रथमच नागपंचमी उत्सवाचे आयोजन असंख्य हितचिंतक व सभासदांच्या आग्रहास्तव करण्यात आले आहे. या उत्सवात स्पर्धा तसेच बक्षिसांची रेलचेल असणार आहे.

सातारा : संजीवनी महिला विकास संस्थे मार्फत यंदा प्रथमच नागपंचमी उत्सवाचे आयोजन असंख्य हितचिंतक व सभासदांच्या आग्रहास्तव करण्यात आले आहे. या उत्सवात स्पर्धा तसेच बक्षिसांची रेलचेल असणार आहे.
महिला सबलीकरणासाठी अग्रेसर असणार्‍या संजीवनी महिला विकास संस्था, सातारा मार्फत भारतीय संस्कृती व महाराष्ट्राची परंपरा जपण्याचा अभिनव उपक्रम म्हणून दांडिया रास गरबा सारखेच झिम्मा फुगडी सुद्धा सर्व महिलांनी एकत्र खेळून नागपंचमी सण आनंद व जल्लोषात साजरा करण्याच्या हेतूने सातारा मध्ये प्रथमच नागपंचमी फेस्टिव्हलचे आयोजन मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता गजानन मंगल कार्यालय फुटका तलाव सातारा येथे करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा वर्षा राजेश भोसले यांनी दिली.
नागपंचमी फेस्टिव्हल मध्ये सहभागी होणार्‍या सर्व महिलांना सुवर्णस्पर्श तर्फे गोल्ड प्लेटेड नथ, विविध स्पर्धा, लकी ड्रॉ, आकर्षक पारितोषिके व अंतिम विजेत्यास रुपसंगम बारटक्के तर्फे पैठणी देण्यात येणार आहे. झिम्मा फुगडी, मंगळागौर, पिंगा, झुला, उखाणा, गाणी, नृत्य, खाद्य जत्रा अशा विविधतेने नटलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 7720033698 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून नोदणी करावी, असे आवाहन उपाध्यक्षा हेमा निकम व सीमा मोरे यांनी केले आहे.
या उत्सवासाठी संस्थेचे संस्थापक राजेश भोसले, मा. नगरसेवक कल्याण राक्षे तसेच लिवो ज्वेलर्स मुंबई, माधवबाग, गुजर ग्रुप, हॉटेल लेक व्ह्यू, टेंपटेशन, चकोर बेकरी यांचे सहकार्य लाभले आहे.