दिव्यांग बांधवांसाठी झटणारे नेतृत्व म्हणजे आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे आहेत. आज सोमवार दिनांक १६ रोजी सकाळी अकरा वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह जिल्हा परिषद इमारतीच्या मागे, सातारा या ठिकाणी दिव्यांगांचा मेळावा होत असून या मेळाव्यासाठी आमदार कडू हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झालेली आहे.
सातारा : जिसका कोई नही, उसका खुदा है यारो... मै नही कहता... किताबो मे लिखा है यारो... या वाक्याप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी झटणारे नेतृत्व म्हणजे आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे आहेत. आज सोमवार दिनांक १६ रोजी सकाळी अकरा वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह जिल्हा परिषद इमारतीच्या मागे, सातारा या ठिकाणी दिव्यांगांचा मेळावा होत असून या मेळाव्यासाठी आमदार कडू हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झालेली आहे.
दिव्यांग कल्याण विभाग यांच्या वतीने शासन आपल्या दारी अभियान राबवून सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी व त्या जाणून घेण्यासाठी आमदार बच्चू कडू साताऱ्यात येत आहेत.
दिव्यांगांच्या कल्याणासाठी झटणारे आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा होत आहे. या मेळाव्याला सातारा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित राहणार आहेत. शासनाने दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी पाच टक्के निधीची तरतूद केलेली आहे. परंतु ,काही ठिकाणी हा निधी खर्च केला जात नाही किंवा हा निधी इतर ठिकाणी वळवला जातो. अशा वारंवार तक्रारी येतात. दिव्यांगांच्या बाबतीत सरकारी अधिकारीही फारच गंभीररित्या काम करताना दिसून येत नाही.
सातारा जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात आले. दि:९ मे २०२३ रोजी या सभागृहाचे भूमिपूजन झाले. तसेच उद्घाटनही झाले. परंतु दिव्यांगांसाठी रॅम्प बांधणे विसरले. तब्बल दहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दिव्यांगांच्या मेळाव्या निमित्त घाईगडबडीने हा रॅम्प बांधण्यात आलेले आहे. याबाबत निश्चितच संबंधित विभागाला जाब विचारला जाणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी चर्चा होणार आहे.
दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी प्रहार संघटना तसेच दिव्यांग प्रेरणा सामाजिक संघटना परिश्रम घेत असून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, आमदार बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव तसेच दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, हरिभाऊ साळुंखे, शैलेंद्र बोर्डे, अमोल निकम, ताज भाई मुलाणी, स्वरूप घाडगे, रवींद्र गाडे, संजय प्रकाशे, अतुल भातुसे, अविनाश कुलकर्णी, गणेश किर्दत, धर्मेंद्र कांबळे, मच्छिंद्र साठे, शालन लोखंडे, मंदाकिनी गाडे, सुनंदा ढेब, सुनिता ओंबळे, अक्षय बाबर, दीपक वाळिंबे, शोभा मोरे यांच्यासह अनेक मान्यवर यानिमित्त रक्तदान कार्यक्रम घेणार आहेत.
सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या शेजारी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या मुख्यालयात अक्षय ब्लड बँकेच्या माध्यमातून हे रक्तदान शिबीर सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे. तसेच या मेळाव्याला सर्व दिव्यांग बांधव येणार असून दिव्यांग बांधवांना सातारा जिल्ह्यातील टोल नाक्यावर माणुसकी भावनेतून त्यांना टोल माफ करावा, असे आवाहन दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी केलेले आहे. सातारकरांनी ज्या ठिकाणी दिव्यांग बांधव दिसतील. त्यांना जिल्हा परिषद मागील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात येण्यासाठी मोफत त्यांना सहकार्य करावे, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. या दिव्यांग मेळाव्यानिमित्त आमदार बच्चू कडू यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून दिव्यांग बांधवांमध्ये चैतन्य पसरलेले आहे. आज खऱ्या अर्थाने त्यांना सक्षम करण्याची भूमिका घेऊन लढणारे आमदार बच्चू कडू यांच्या कार्यक्रमाला सातारा जिल्हा पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


