maharashtra

पाण्यात बुडून एकाचा मृत्यू


पाण्यात बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : पाण्यात बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या पूर्वी विजय रमेश शिंदे रा. बोरगाव, ता. सातारा यांचा उरमोडी नदी शेजारील नवीन पुलाजवळ असलेल्या एका विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.