maharashtra

पोदार इंटरनॅशनल स्कूल सातार्‍यामध्ये जगातील अव्वल फ्री-स्टाईल फुटबॉलपटू जेमी नाईट ची कार्यशाळा संपन्न


पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा तर्फे जगातील टॉप टेन ़फुटबॉंल फ्रीस्टाईलर पैकी एक जेमी नाईट यांना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. जेमी नाईट यांच्या नावे अनेक गिनीज बुक विक्रम आहेत, त्यांनी सातार्‍याला प्रथम भेट दिली.

सातारा : पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा तर्फे जगातील टॉप टेन ़फुटबॉंल फ्रीस्टाईलर पैकी एक जेमी नाईट यांना शाळेत निमंत्रित करण्यात आले होते. जेमी नाईट यांच्या नावे अनेक गिनीज बुक विक्रम आहेत, त्यांनी सातार्‍याला प्रथम भेट दिली.
जेमी जगातील सर्वात अनुभवी आणि सर्वाधिक मागणी असलेल्या व्यावसायिक फुटबॉल फ्रीस्टाइलर्सपैकी एक आहे. पोदार एज्युकेशन नेटवर्कच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून त्यांच्या दुसर्‍या भारत भेटीमध्ये खेळांवर जास्त लक्ष केंद्रित करणे आणि विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात खेळाडू आणि प्रशक्षिकांकडून उत्कृष्ट कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे मिळविण्यात सक्षम बनवणे होते. यावेळी शाळेचे  प्रिन्सिपल सुनील सिंग रावत उपस्थित होते.  
जेमी फुटबॉलवरील त्याच्या जबरदस्त नियंत्रणासाठी ओळखला जातो आणि त्याने जगभरात प्रवास केला आहे, प्रसिद्ध जागतिक ब्रँड्सशी सहयोग केला आहे. 2017 आणि 2018 मध्ये बॅक-टू-बॅक चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये खेळपट्टीवर कामगिरी केली आहे. त्याच्या सातत्य आणि सूक्ष्म अंमलबजावणीमुळे त्याला जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंकडून तसेच चाहत्यानांकडून खूप प्रेम मिळाले आहे. जेमीच्या अनन्यसाधारण  कृतींमुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते.
जेमीचा ठाम विश्वास आहे की, फ्री स्टाइल फुटबॉल शारीरिक आणि मानसिक आरोग्य विकसित करण्यात मदत करते आणि वाढीच्या मानसिकतेचे महत्त्व शिकवते. यामुळे पोदार एज्युकेशन नेटवर्कचा सर्वांगीण शक्षिणाला भक्कम पाठिंबा मिळतो.
यावेळी बोलताना जेमी नाईट म्हणाले, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल इतका उत्साह, प्रतिभा आणि आवड आहे हे पाहून खूप आनंद झाला. भारत फुटबॉल खेळात जागतिक खेळाडू बनू शकतो आणि कदाचित फुटबॉल विश्वचषकात लवकरच भाग घेईल अशी मी अशा बाळगतो. मला इथे यायला खूप आवडले आणि आशा आहे की मी लवकरच परत येईन.
पोद्दार एज्युकेशन नेटवर्कचे संचालक हर्ष पोदार यांनी विद्यार्थ्यांच्या उर्जा आणि उत्कटतेबद्दल आनंद व्यक्त केला. जेमी ने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाविषयी फोकस ठेवणे महत्वाचे आहे हे लक्षात आले. ग्रेड्सपेक्षा जास्त या आमच्या विश्वासावर ठाम राहून, आमच्या विद्यार्थ्यांनी अशा कार्यशाळेतून शिकलेल्या गोष्टींचे अनुकरण करावे अशी आमची इच्छा आहे. मग ती शैक्षणिक असो किंवा गैर-शैक्षणिक असो. आम्हाला आशा आहे की आमच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सुरुवातीच्या काळात अशा रोमांचक संधी त्यांना अखेरीस सर्वात मोठ्या टप्प्यावर देशाचे प्रतिनिधत्वि करण्यास मदत करतात.