maharashtra

पोलीस वसाहती मधून एका पोलिसाचीच दुचाकी चोरीला


A policeman's two-wheeler was stolen from the colony
येथील गोळीबार मैदान पोलीस वसाहती मधून एका पोलिसाचीच दुचाकी चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

सातारा : येथील गोळीबार मैदान पोलीस वसाहती मधून एका पोलिसाचीच दुचाकी चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
गणेश कापरे (वय 34) हे जिल्हा पोलिस दलात कार्यरत असून ते गोडोली येथील गोळीबार मैदान पोलीस वसाहतीमध्ये राहतात. त्यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या वसाहतीमधील बिल्डिंग समोर पार्क केली होती.  ही दुचाकी अज्ञात चोरट्याने दिनांक 23 रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सात या वेळेत चोरून नेली. त्यांच्या गाडीची किंमत सुमारे 30 हजार रुपये आहे. गाडी चोरीला गेल्याचे समजल्यानंतर त्यांनी गोळीबार मैदान परिसरात गाडीचा शोध घेतला. मात्र गाडी सापडली नाही. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.