maharashtra

सत्ताधाऱ्यांना डावलून भणंगमध्ये सर्व जागांवर अपक्षांचा झेंडा!


भणंग ग्रामपंचायतीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक मच्छिंद्र क्षीरसागर यांच्या पाडळेश्वर पॅनेलला मतदारांनी नाकारले असून थेट सरपंच पद व अपक्षांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली आहे. पॅनेलचा फक्त एक उमेदवार निवडून आला आहे.

सातारा : भणंग ग्रामपंचायतीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक मच्छिंद्र क्षीरसागर यांच्या पाडळेश्वर पॅनेलला मतदारांनी नाकारले असून थेट सरपंच पद व अपक्षांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली आहे. पॅनेलचा फक्त एक उमेदवार निवडून आला आहे.
आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मच्छिंद्र क्षीरसागर यांनी भणंग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पॅनलकडून 7 उमेदवार उभे केले होते. यापैकी 6 उमेदवारांचा अपक्षांनी पराभव करून भणंगमध्ये इतिहास घडवला आहे. थेट सरपंचपदासाठी अपक्ष गणेश साईबाबा जगताप यांनी मच्छिंद्र क्षीरसागर यांच्या अधिकृत पॅनेलच्या सुहास जाधव यांचा पराभव केला. प्रभाग १ मध्ये संगीता सत्यवान जाधव - अपक्ष (२०३), प्रभाग २ मध्ये पाडळेश्वर पॅनेलचे विकास रमेश देशमुख (१८२), श्रीमती रंजना नारायण जाधव अपक्ष (२३२), सौ. मथुरा नारायण जाधव अपक्ष (२५१) यांनी विजय मिळवला. प्रभाग ३ मध्ये सचिन भोसले (१३९), श्रीमती हाफीजा जमाल (१५४) यांनी विजय मिळवला. निवडून आलेले अपक्ष आमच्या विचाराचे असल्याचा दावा भाजप व राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. सर्व नवनर्वाचित सरपंच व सदस्य याबाबत काय भुमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.