सातारा जिल्ह्यात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणार्या दारू अड्डयांवर छापे टाकून 3 हजार 390 रुपयांची दारू हस्तगत केली.
सातारा : सातारा जिल्ह्यात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणार्या दारू अड्डयांवर छापे टाकून 3 हजार 390 रुपयांची दारू हस्तगत केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण, ता. फलटण येथील सोमवार पेठेत फिरंगाई मंदिरा शेजारी तेथीलच महादेव पुंडलिक राजगे याच्याकडून 1 हजार 150 रुपये किमतीची पाच लिटर हातभट्टीची दारू हस्तगत केली. दुसर्या घटनेत वाई, ता. वाई येथील रविवार पेठेत असणार्या कल्पतरू मंगल कार्यालयाच्या आडोशाला तेथीलच मंगेश लक्ष्मण नलावडे याच्याकडून 2 हजार 240 रुपये किमतीची देशी दारू हस्तगत केली.


