maharashtra

चोरट्यांच्या हल्ल्यात महिला जखमी


Woman injured in burglary
सातारा तालुक्यातील शिवथर येथे सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे. मनिषा साबळे (वय ३३) असे जखमी महिलेचे नाव असून चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

सातारा : सातारा तालुक्यातील शिवथर येथे सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे. मनिषा साबळे (वय ३३) असे जखमी महिलेचे नाव असून चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान, मनिषा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या घटनेनंतर शिवथरमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील शिवथर येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास एकाच ठिकाणावरील दोन बंद घरे फोडून चोरीचा प्रयत्न केला. पहिल्या घरफोडीमध्ये काहीच सापडले नाही. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळविला. मात्र, त्या घराला बाहेरुन कुलूप लावले होते. हे कुलूप तोडत असतानाच त्याच घरातील मनिषा साबळे यांना जाग आली. याचवेळी कुलूप तोडून चोरट्यांनी आत घरात प्रवेश करताच त्यांनी आरडाओरडा सुरु केला. हा आरडाओरडा सुरु असतानाच चोरट्यांनी मनिषा यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला आणि तेथून पळ काढला. यात मनिषा जखमी झाल्या असून दोन चोरटे असल्यची माहिती त्यांच्याकडून यावेळी देण्यात आली. मनिषा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.