शिंदेवाडी फाटा, ता. फलटण येथून एक जण बेपत्ता झाल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : शिंदेवाडी फाटा, ता. फलटण येथून एक जण बेपत्ता झाल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२६ ऑक्टोंबर २०२२ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास संतोष नथुराम भिसे, वय ४८ हे वीर, ता. पुरंदर येथे देवदर्शनाला जातो असे सांगून निघून गेले ते अद्याप घरी परत न आल्याची तक्रार त्यांचा मुलगा राहुल संतोष भिसे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.


