maharashtra

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी क्रेन चालकावर गुन्हा


अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी क्रेन चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी क्रेन चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडीच्या हद्दीत कोल्हापूर ते पुणे मार्गिकेवर चिंदेपीर दर्ग्याजवळ क्रेन (एमएच 43 बीवाय 4611) वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन उभी होती. त्यास पाठिमागून दुचाकी धडकून अपघात झाला. ही घटना दि. 8 रोजी रात्री 11.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणी  अपघातग्रस्त अभिजीत सतिश सूर्यवंशी (वय 23, रा. वेचले, ता. सातारा) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या सोबत त्याचा मित्रही होता. या अपघातात दोघेही जखमी झाले आहेत. पोलीस हवालदार कारळे तपास करत आहेत.