वेळेकामथी ता. सातारा येथील एका युवकाने वृध्दास मारहाण केली. याप्रकरणी त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश रामचंद्र शिंंदे वय ३५, रा. वेळेकामथी, ता. सातारा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
सातारा : वेळेकामथी ता. सातारा येथील एका युवकाने वृध्दास मारहाण केली. याप्रकरणी त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश रामचंद्र शिंंदे वय ३५, रा. वेळेकामथी, ता. सातारा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ रोजी या घटनेतील तक्रारदार मधुकर विठ्ठल शिंदे वय ६८, सध्या रा. करंजे, सातारा, मूळ रा. वेळेकामथी, ता. सातारा हे गावातील पुलावरुन निघालेले असताना निलेश शिंदे हा मोटारसायकलवरुन आला. त्याने मधुकर शिंदे यांना शिवीगाळ करत डोक्यात, पाठीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. आमच्या गावात तू कशाला आला, तुझा काय संबंध असे म्हणत त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. यामध्ये मधुकर शिंदे गंभीर जखमी झाले आहेत.
मधुकर शिंदे यांनी दि. ४ रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर निलेश शिंदे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्याला अटक झालेली नाही.


