महामार्गावरील सातारा शहरालगत वाढे फाटा येथे शुक्रवारी दुपारी एसटी व ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये एकजण जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहतुक ठप्प झाली. मात्र ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमीला उपचारासाठी रुग्णलयात पाठवून वाहतुक सुरळीत केली.
सातारा : महामार्गावरील सातारा शहरालगत वाढे फाटा येथे शुक्रवारी दुपारी एसटी व ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये एकजण जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहतुक ठप्प झाली. मात्र ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमीला उपचारासाठी रुग्णलयात पाठवून वाहतुक सुरळीत केली.
याबाबत अधिक माहिती अशी, ट्रक व एसटी सातारच्या दिशेने येत होती. दोन्ही वाहने वाढे फाट्यावरील पुलानजीक आल्यानंतर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने एसटीला पाठीमागून धडक बसली. या घटनेत ट्रक चालकालाच दुखापत झाली. अपघातानंतर परिसर ठप्प झाला. जाणारी-येणारी वाहतुक थांबली. यावेळी वाहतुक विभागाचे पोलिस सुभाष कोळेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला उपचारासाठी पाठवून वाहतुक सुरळीत केली. यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून रात्री उशीरापर्यंत नोंद झालेली नव्हती.


