बेदरकारपणे ट्रक चालवून चाळीस वर्ष इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचा मावसभाऊ संदीप हरी बागल राहणार सोलापूर यांनी बोरगाव पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली आहे.
सातारा : बेदरकारपणे ट्रक चालवून चाळीस वर्ष इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रक चालकावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचा मावसभाऊ संदीप हरी बागल राहणार सोलापूर यांनी बोरगाव पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली आहे.
दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता लिंबाची वाडी तालुका जिल्हा सातारा येथे मयत रवींद्र महिपती जाधव हे मोटरसायकलवरून जात असताना ट्रक चालक नंदकुमार मुरुगण राहणार कांचीपुरम तामिळनाडू याने बेदरकारपणे ट्रक चालून दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये जाधव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ अधिक तपास करत आहेत.


