maharashtra

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 मार्च रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पिरवाडी कॅनल जवळ सदर बाजार येथे अल्लाउद्दीन अन्वर शेख रा. लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी सदर बाजार सातारा याला  तेथीलच अभय संजय देवकुळे, सौरभ संजय देवकुळे या दोघांनी हाताने व दगडाने मारहाण केली. याप्रकरणी त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.