सासपडे, ता. सातारा येथे एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सासपडे, ता. सातारा येथे एका महिलेस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ मे रोजी दहा वाजण्याच्या सुमारास सासपडे येथे पूर्वीचा भांडणातून तेथीलच संगीता अरुण यादव ,वय ५२ यांना विजय भगवान यादव, रामचंद्र भगवान यादव, शिवाजी भगवान यादव, वंदना शिवाजी यादव, शैला रामचंद्र यादव यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या मुलास ढकलून देऊन त्यालाही मारहाण केल्याची तक्रार बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.


