maharashtra

हद्दवाढीतील मिळकतींचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी

एडवोकेट सचिन तिरोडकर यांचे पालिकेला निवेदन

हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्या भागातील मिळकतींचे फेरस सर्वेक्षण करावे. तसेच वसुलीप्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी एडवोकेट सचिन तिरोडकर यांनी निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे. त्यांनी झालेली मिळकत पाहणी सदोष असल्याचा आरोप केला आहे.

सातारा : हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्या भागातील मिळकतींचे फेरस सर्वेक्षण करावे. तसेच वसुलीप्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी एडवोकेट सचिन तिरोडकर यांनी निवेदनाद्वारे पालिकेकडे केली आहे. त्यांनी झालेली मिळकत पाहणी सदोष असल्याचा आरोप केला आहे.
हद्दवाढीनंतर शाहूपुरी, विलासपूर या दोन ग्रामपंचायती तसेच शाहूनगर, पिरवाडी व इतर उपनगरे पालिकेच्या हद्दीत आली. या भागातील मिळकती यांची पाहणी करत पालिकेने त्या ठिकाणच्या नागरिकांना मिळकत कर नोटिसा बजावल्या. मागील चतुर्थ वार्षिक पाहणीला अधीन राहून या नोटिसा बजावण्यात आल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे.
या नोटीसीनुसार भरावी लागणार रक्कम जास्त असून त्या विरोधात नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. यानुसार पालिकेने भागनिहाय घरपट्टी आकारणी बाबत नागरिकांच्या तक्रारी दाखल करून घेण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया पालिकेने सुरू केली असली तरी त्यात अनेक त्रुटी असून अनेक ठिकाणी प्राथमिकरित्या उभारलेल्या सुविधांची देखील मापे घेण्यात आली आहेत. यामुळे कर आकारणी क्षेत्रात वाढ होऊन त्याचा बोजा नागरिकांवर पडत आहे. पाहणी दरम्यान कर्मचाऱ्यांकडून चुका झाल्याने मिळकत पाहणी पुन्हा करण्याची तसेच तोपर्यंत वसुली स्थगितीची मागणी ऍडव्होकेट तिरोडकर यांनी निवेदनात नमूद केली आहे.