maharashtra

अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू


One died in the accident
अपघातात जखमी झालेल्या एकाचा पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.

सातारा : अपघातात जखमी झालेल्या एकाचा पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिंचणेर वंदन, ता. सातारा येथील तुषार चंद्रकांत बर्गे, वय २३ हा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची खबर पोलीस हवालदार देशमुख यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.